कारगिल विजय दिनानिमित्त शहीद जवान स्मारक येथे आदरांजली

देवरुख :  दिनांक २६ जुलै हा देशभरामध्ये कारगिल विजय दिन म्हणून साजरा केला जातो. आज पाकिस्तानवर मिळवलेल्या कारगिल युद्ध विजयाला २५ वर्षे पूर्ण झाली. दरवर्षीप्रमाणे देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या शहीद जवान स्मारकामध्ये कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला.

याप्रसंगी देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी माजी सैनिकांच्या उपस्थितीत शहीद स्मारकाला श्रद्धांजली वाहिली. याप्रसंगी कारगिल युद्धामध्ये भाग घेतलेल्या पराक्रमी सैनिक श्री महेशजी सावंत यांचा सत्कार करण्यात आला आणि उपस्थितांना त्यांनी युद्धामधील अनुभव कथन केले.

या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष सदानंद भागवत यांनी मुलांनी आपल्या शूर सैनिकांच्या पराक्रमाच्या गोष्टी वाचाव्यात आणि त्यातून प्रेरणा घ्यावी यासाठी शालेय विद्यार्थ्यांकरता ‘परमवीरचक्र प्रश्नमंजुषा’ ही स्पर्धा संस्थेमार्फत राबविणार असल्याचे सांगितले.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE