www.ladkibahin.maharashtra.gov.in नावाने वेबसाईट सुरु
रत्नागिरी, दि. २ : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत महत्वाची बातमी आली आहे. 1 ऑगस्ट 2024 पासून मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत लाभार्थ्यांचे अर्ज भरण्याची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी http://www.ladkibahin.maharashtra.gov.in हे संकेत स्थळ सुरु करण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीकांत हावळे यांनी दिली.

ज्या लाभार्थ्यांनी नारिशक्तिदूत App वर अर्ज भरले आहेत त्यांना पुन्हा या पोर्टल वर अर्ज भरण्याची गरज नाही.
ज्या पात्र इच्छुक लाभार्थांनी अद्याप अर्ज भरलेले नाहीत त्या लाभार्थांनी या संकेतस्थळावर जाऊन आपले अर्ज भरावेत
पोर्टल लिंक – http://www.ladkibahin.maharashtra.gov.in अशी असल्याचे कळवण्यात आले आहे.
