लांजा : लांजा तालुक्यातील माचाळ येथे आयुष्यमान आरोग्य मंदिर शिपोशी यांच्यामार्फत NCD व आरोग्य तपासणी शिबीर दि. 2ऑगस्ट रोजी उत्साहात पार पडले. ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे शिबिराचा लाभ घेतला.
या शिबिरामध्ये ग्रामस्थांची मधुमेह, रक्तदाब तपासणी करण्यात आली. HLL मार्फत cbc, Rft, Lft इत्यादी ब्लड तपासणी तसेच थुंकी तपासणीसाठी नमुने घेऊन किरकोळ उपचार करण्यात आले. ग्रामस्थांना पावसाळ्यात होणारे आजार व घ्यावयाची काळजी करावयाच्या उपायोजना याबाबत आरोग्य शिक्षण देण्यात आले. या शिबिराला तालुका आरोग्य अधिकारी .डॉ. प्रशांतकुमार परगे यांनी भेट दिली व मार्गदर्शन केले तसेच जि. प. शाळा माचाळ येथे डॉ. प्रशांतकुमार परगे, तालुका आरोग्य अधिकारी व डाॅ .नामदेव ढोणे वैद्यकीय अधिकारी, शिपोशी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
या कार्यक्रमाला डॉ. नामदेव ढोणे, वैद्यकीय अधिकारी, शिपोशी, डॉ. दिनेश कास्टे CHO, दीपक डोळे, अशोक वाघाटे, पी. डी. कांबळे. श्री.विवेकानंद नाईक, आरोग्य सहाय्यक मिलिंद संसारे, मिथीन मयेकर श्रीम. सुप्रिया यादव , श्री.गुरव आरोग्य सेवक, आझाद विचारे, आरोग्य सेवक, श्रीम.नंदिनी चव्हाण, गटप्रवर्तक, श्रीम.स्वप्नाली अवसरे,आशा. श्रीम.क्रान्ति कांबळे , पी. पी. पट्ठेबहाद्दूर (शिक्षक), मनोज धाडवे, रुग्णवाहिका चालक व इतर कर्मचारी उपस्थित होते.
