मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण | ३५ उद्योजक, १ हजार उमेदवारांची महास्वयंम पोर्टलवर रजिस्ट्रेशन

  • तेरा उद्योजक, शासकीय आस्थापनात १०८ उमेदवार रुजू

रत्नागिरी, दि. ३ : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत अवघ्या 15 दिवसात जिल्ह्यातील जवळपास 35 उद्योजक व 1 हजार उमेदवार यांनी महास्वयंम पोर्टलवर नोंदणी केली आहे. त्यापैकी 13 उद्योजक/शासकीय आस्थापना यांच्याकडे 108 उमेदवार रुजू करुन घेण्यात आलेले आहेत. महसूल पंधरवडानिमित्त पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते, जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांच्या उपस्थितीत या उमेदवारांना प्रमाणपत्र देण्यात आल्याची माहिती जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाच्या सहाय्यक आयुक्त इनुजा शेख यांनी दिली.

ब्राम्हण हितवर्धिनी ग्रामीण बिगर शेती सहकारी दापोली येथे 6 प्रशिक्षणार्थी, गद्रे मरीन एक्सपोर्ट प्रा. लि., एमआयडीसी मिरजोळे येथे 22 प्रशिक्षणार्थी, लक्ष्मी कश्यु एमआयडीसी मिरजोळे येथे 16 प्रशिक्षणार्थी, श्री गोपाळकृष्ण ग्रामीण बिगर शेती सहकारी मर्यादित, दापोली येथे 1, सुर्वे ग्रुप लोटे परशुराम चिपळूण येथे 21 प्रशिक्षणार्थी, स्वामी स्वरुपानंद सहकारी पतसंस्था मर्यादित रत्नागिरी मध्ये 5, राजापूर को-ऑपरेटीव्ह बँक लि, राजापूर येथे 17, झिलानी मरीन मिरजोळे येथे 5, राजापूर तालुका कुणबी सहकारी संस्था मर्या, राजापूर येथे 3, जिल्हा परिषदमध्ये 9, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामद्योग मंडळ आणि नगर रचना आणि मुल्य निर्धारण विभाग प्रादे‍शिक योजना येथे प्रत्येकी 1 असे एकूण 108 प्रशिक्षणार्थी रुजू झाले आहेत.

या योजनेचा लाभ जास्तीत जास्त उद्योजक व उमेदवारांनी घ्यावा, असे आवाहन श्रीमती शेख यांनी केले आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

best news portal development company in india

READ MORE