रत्नागिरी : तालुक्यातील मिरजोळे येथील “नागरिकांशी संवाद” कार्यक्रमाला जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी उपस्थिती दर्शवली. यावेळी नवनिर्वाचित सरपंच रत्नदीप पाटील यांचा सत्कार ना. सामंत यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी शासनाच्या विविध योजनेचा आणि विकास कामांचा लाभ आपल्यापर्यंत पोचवण्याचे काम करत असल्याचं पालकमंत्र्यांनी सांगितलले.

या प्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राहुल पंडित, तालुकाप्रमुख बाबू म्हाप, युवासेना तालुकाप्रमुख तुषार साळवी, विभागप्रमुख प्रवीण पवार, महिला विभाग प्रमुख श्रीम. पंडिये, नव्याने पदभार स्वीकारलेले सरपंच रत्नदीप पाटील, शंकर पाटील, फैय्याज मुकादम, राजू तोडणकर, गजानन गुरव, मुन्ना घोसाळे, सुनील घोसाळे, हर्षराज पाटील, तसेच ग्रामस्थ, पदाधिकारी, महिला उपस्थित होत्या.

