चिपळूण : गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय मांडकी पालवण अंतर्गत ग्रामीण कृषि कार्यानुभव 2024 -25 कार्यक्रमांतर्गत आबिटगाव येथे महिलांसाठी दुग्धजन्य पदार्थ बनविण्याचे प्रात्यक्षिक घेण्यात आली. दुधापासून पनीर आणि रसगुल्ले याचे प्रात्यक्षिक घेण्यात आली.

यावेळी सहभागी महिलांनी सुद्धा प्रात्यक्षिक करून बघितले. चीज, पनीर, तूप, दही,बासुंदी, पेढे ,खवा यांच्याबद्दल महिलांना माहिती देण्यात आली. प्रात्यक्षिकाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता.
या कार्यक्रमात कृषी कन्या साक्षी थोरात, रितिका कांबळे, वेदिका शिगवण, अनुजा माने, सानिका बिरांजे, वैष्णवी शिर्के, स्नेहल गरुड, साक्षी मोहिते, क्रिस्टीना, प्रियता मांजरेकर, मानसी वाघाटे यांच्या नियोजनात हा कार्यक्रम पार पडला.
