रत्नागिरी रेल्वे स्टेशनवर टाकाऊ स्पेअर पार्टपासून बनवला रोबोट!

रत्नागिरी : स्वच्छता ही सेवा मूलमंत्र जपणाऱ्या कोकण रेल्वेने रत्नागिरी स्थानकावर टाकाऊ स्पेअर पार्टपासून रोबोट आणि आकर्षक लॅम्प बनवण्याचा उपक्रम राबवण्यात आला आहे.

स्वच्छता अभियानांतर्गत कोकण रेल्वेने विविध उपक्रम सर्व रेल्वे स्थानकांवर राबवले आहेत  रत्नागिरी स्थानकातही स्वच्छता स्वच्छता अभियानासह पर्यावरण जनजागृती करण्यात येत आहे रत्नागिरी तांत्रिक विभाग (मेकॅनिकल) येथील अभियंता श्री प्रीतम पंडुरकर आणि आणि सहकारी कर्मचारी यांनी टाकाऊ पासून टिकाऊ ही संकल्पना राबवताना रेल्वे इंजिनचे निरूपयोगी पार्टपासून रोबोटची प्रतिकृती तयार केली आहे घरामध्ये अंतर्गत सजावटीसाठी उपयोगी पडणारे शोभिवंत इलेक्ट्रिक लॅम्प बनवविले आहेत.

पर्यावरण संतुलनासाठी कचऱ्याचे कसे व्यवस्थापन करावे याची जनजागृती रत्नागिरी रेल्वे स्थानकावर प्रवाशांना माहिती देण्यात येत आहे रेल्वे कर्मचाऱ्यांमार्फत कचरा व्यवस्थापन याची पत्रके आणि घोषवाक्य प्रवाशांमध्ये वितरीत केली जात आहेत.

कोकण रेल्वेने आपल्या सोशल मीडियावर रत्नागिरी रेल्वे स्थानक याड मधील यार्ड मधील टाकाऊ वस्तूंपासून पुनर्वापर करणाऱ्या प्रतिकृती लक्ष वेधून घेत आहेत कोकण रेल्वे या अभियानाचे कौतुक होत आहे

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE