कोकणातील ग्रामदैवतांविषयी माहिती पाठविण्याचे आवाहन

रत्नागिरी : रत्नागिरीतून गेली आठ वर्षे प्रसिद्ध होणाऱ्या कोकण मीडियाच्या यावर्षीच्या दिवाळी विशेषांकासाठी कोकणातील ग्रामदैवते हा विषय निवडण्यात आला आहे. त्याकरिता लेख आणि चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली असून माहिती आणि चित्रे पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पालघर ते सिंधुदुर्गापर्यंत पसरलेल्या कोकणातील विविध ग्रामदैवतांबद्दलचे एक हजार शब्दांपर्यंतचे लेख आणि कोकणातील चित्रकारांना आणि उदयोन्मुख चित्रकारांना वाव देण्याच्या दृष्टीने ‘कोकणातील ग्रामदैवते’ याच विषयावर चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेकरिता ए फोर आकारात उभे (व्हर्टिकल/पोर्ट्रेट) रंगीत चित्र पाठवावे. कोकणातल्या ग्रामदेवतांची माहिती संकलित व्हावी, केवळ तपशील देण्याऐवजी लालित्यपूर्ण लेखनामुळे ही माहिती सर्वच वाचकांना आवडावी, त्या ग्रामदेवतेबद्दल, त्या गावाबद्दल कुतूहल निर्माण व्हावे, त्या गावाला भेट देण्याची उत्सुकता निर्माण व्हावी, हा या स्पर्धेमागचा हेतू आहे. गावाचे आणि ग्रामदेवतेचे नाव, स्थानिक नाव, तालुका, जिल्हा, गावाकडे जाण्याचा रस्ता, मंदिराचा तपशील, परिसर, प्रमुख सण-उत्सव, ग्रामदेवतेची वैशिष्ट्ये असा तपशील लेखात असावा. सर्वोत्कृष्ट लेख आणि चित्रांना रोख पारितोषिके दिली जाणार आहेत. याशिवाय लेख, कथा, कविता, व्यंगचित्रे असे साहित्यही कोकण मीडियाच्या दिवाळी अंकात प्रसिद्ध होणार आहे.
आपले साहित्य १२ ऑक्टोबर २०२४ पर्यंत संपादक, साप्ताहिक कोकण मीडिया, साप्ताहिक कोकण मीडिया, कुसुमसुधा, ६९७, रामचंद्रनगर (श्रीनगर), मु. पो. खेडशी, ता. जि. रत्नागिरी-४१५६३९ या पत्त्यावर किंवा kokanmedia2@gmail.com या ईमेलवर पाठवावे. स्पर्धेविषयीची अधिक माहिती https://kokanmedia.in/2024/09/18/kokanmediadiwalee2024/ या लिंकवर मिळेल.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

best news portal development company in india

READ MORE