लांजा : देशी गायींना ‘राज्य माता गो माता’ घोषित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे आज सोमवारी पशूसंवर्धन, दुग्ध व्यवसाय, कृषि विभाामार्फत हे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत
गायींना राज्य माता घोषित करण्याचा या निर्णयाचे शेतकरी आणि गो शाला पालक यांनी स्वागत केले आहे.
देशी गायींना आपल्या जीवनात अनन्य साधारण महत्व आहे. देशी गायीचे दूध मानवी आहारात मोठे महत्व आहे. ते पूर्ण अन्न आहे. गोमूत्र, शेण याला सेंद्रिय शेतीसाठी मागणी आहे. आयुर्वेद उपचार पद्धती यात गोमूतत्राचा वापर होतो. देशी गाय ही गोधन असल्याने देशी गायींची घटनारी संख्या लक्षात घेता राज्य शासनाकडे विविध गो शाळा पालक, शेतकरी यांनी देशी गायींना संरक्षित करण्याची मागणी केली होती. देशी गायींचे वैदिक काळापासून असणारे महत्व, दुधाची मानवी आहारात तील उपयुक्तता, आयुर्वेद उपचार पद्धती, गोमूत्र, शेण आदीचा शेतीसाठी वापर लक्षात घेऊन राज्य शासनाने देशी गायींना राज्य माता घोषित केले आहे.
लांजा खेरवसे येथील नंदा बिर्जे यांनी गायींना गोमाता घोषित करण्यासंदर्भातील निर्णयाचे स्वागत केले आहे. गोपालन कार्यकर्ता यांना ऊर्जा देणारा निर्णय आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
