शालेय सायकल स्पर्धेत १४ वर्षे वयोगटात टाईम ट्रायलमध्ये चिपळूणचा ईशान वझे प्रथम

सावर्डे :  जिल्हास्तरीय शालेय सायकल स्पर्धा डेरवण येथे दि.2 ऑक्टो रोजी पार पडली. या स्पर्धेत 14 वर्ष वयोगटात टाइम ट्रायलमध्ये ईशान वझे (चिपळूण ) – प्रथम, रुद्र जाधव -द्वितीय क्रमांक पटकावला.
स्पर्धेत  17 वर्ष वयोगटात टाइम ट्रायल प्रकारात सुमेध आंबेकर (चिपळूण ) – प्रथम, श्री खानविलकर (दापोली ) -द्वितीय, वरद कदम (दापोली)-तृतीय आला.
17 वर्ष वयोगट मास स्टार्ट – राज आंबेकर (रत्नागिरी)-प्रथम, पियुष पवार (दापोली )-द्वितीय, वेदांत ढोल्ये यांनी (रत्नागिरी )-तृतीय क्रमांक मिळवला.
17 वर्ष वयोगट मुली – स्नेहा भाटकर (दापोली )-प्रथम, आध्या कवितके(रत्नागिरी)- द्वितीय क्रमांक.
19 वर्ष वयोगट – टाइम ट्रायल -पृथ्वी पाटील(चिपळूण)- पहिला तर युवराज चव्हाण (चिपळूण) याचा दुसरा क्रमांक आला. स्पर्धेचे आयोजक म्हणून श्री. गणेश जगताप आणि श्री अक्षय मारकड, (क्रीडाधिकारी रत्नागिरी),श्री. पराडकर सर,श्री. अविनाश पवार, श्री. विनायक पवार यांनी काम पाहिले.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

best news portal development company in india

READ MORE