देशाचे अनमोल रत्न हरपले! उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनाच्या वृत्तानंतर अवघा देश शोकसागरात बुडाला

मुंबई : उद्योग विश्वातील एक आदरणीय व्यक्तिमत्त्व, ज्यांनी फक्त भारतातच नव्हे तर जागतिक पातळीवर आपल्या कर्तृत्वाने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली, असे टाटा समूहाचे सर्वेसर्वा आणि जगभरातील अनेकांचे प्रेरणास्रोत रतन टाटा यांच्या निधनाने अवघा देश शोकसागरात बुडाला.

वयाच्या ८६ व्या वर्षी उद्योगपती रतन टाटा यांनी बुधवारी रात्री मुंबईतील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ब्रिच कँडी हॉस्पिटलमध्ये तातडीने दाखल झाले.

गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. प्रकृती खालावल्यामुळे रतन टाटा यांना मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आणि रात्री उशिरा त्यांचं निधन झालं. आपल्या शालीन आणि सुसंस्कृत स्वभावासाठी ओळखल्या जाणाऱ्या रतन टाटा यांच्या निधनाने उद्योगविश्वासह सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. 

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE