मत्स्यगंधा एक्सप्रेसही आता धावणार अत्याधुनिक एलएचबी रेकसह!

१७ फेब्रुवारी २०२५ पासून होणार बदल

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गे धावणारी लोकमान्य टिळक टर्मिनस ते मंगळुरू सेंट्रल ही दैनंदिन रेल्वे गाडी अत्याधुनिक एलएचबी रेकसह धावणार आहे. देशभरातील विविध मार्गांवर धावणाऱ्या जुन्या गाड्या बदलून त्या ऐवजी एलएचबी श्रेणीतील रेक वापरून गाड्या चालवण्याच्या रेल्वेच्या धोरणानुसार हा बदल होणार आहे.

या संदर्भात कोकण रेल्वेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार मंगळुरू सेंट्रल ते लोकमान्य टिळक टर्मिनस (12620) या फेरीसाठी दि. 17 फेब्रुवारी 2025 तर लोकमान्य टिळक टर्मिनस ते मंगळूरु सेंट्रल (12619) या फेरीसाठी दिनांक 18 फेब्रुवारी 2025 पासून हा बदल केला जाणार आहे.

नव्या कोचरचनेनुसार ही गाडी एलएचबी श्रेणीतील धावू लागल्यानंतर पूर्वीच्या 23 ऐवजी 22 डब्यांची धावणार आहे.

अशी असेल नवीन कोचरचना

  • टू टायर वातानुकूलित – २ डबे
  • थ्री टायर वातानुकूलित – ४ डबे
  • इकॉनॉमिक थ्री टायर एसी – २ डबे
  • स्लीपर श्रेणी ८ डबे
  • सर्वसाधारण श्रेणी – ४ डबे
  • जनरेटर कार – १
  • एस एल आर -१ डबा

मत्स्यगंधा एक्सप्रेस ही कोकण रेल्वे मार्गे धावणारी जुन्या गाड्यांपैकी एक गाडी आहे. या गाडीचे पूर्वीचे डबे जुने झाल्याने गाडीसाठी नवीन रेक उपलब्ध करण्याची मागणी वेळोवेळी करण्यात आली होती. रेल्वेचे धोरण आणि प्रवाशांची मागणी लक्षात घेता आता येत्या फेब्रुवारीपासून ही गाडी नवीन एलएचबी कोचसह धावणार आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

best news portal development company in india

READ MORE