सहावीत शिकणाऱ्या गौरांग कुवेसकरने बनविला स्वकल्पनेतील किल्ला!

संगमेश्वर :  ज्ञानदीप विद्यालय बोरज येथे सहावीच्या वर्गात शिकणाऱ्या गौरांग कुवेसकर या विद्यार्थ्याने दिवाळीच्या सुट्टीत सुंदर किल्ला असून गेली सहा वर्षे तो दिवाळी सणादरम्यान किल्ला बनविण्याचा आपला छंद जोपासत आहे.

गौरांग हा अभ्यासातही हुशार असून शाळेत विविध स्पर्धेत भाग घेऊन तो सतत यश मिळवत असतो. गत वर्षी तो शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत आला होता. त्याला चित्रकलेची आवड असल्याने शालेय अभ्यास झाल्यानंतर तो नेहमीच चित्र रेखाटन करत असतो. गेली सहा वर्षे तो स्वतःच्याच बुध्दीने कोणत्या ठरावीक अशा गडकिल्ल्याची प्रतिकृती न बनविता  प्रत्येक वेळी किल्ल्यांचे नवीन आकार बनविण्यावर भर देत असतो. किल्ले बनविताना आपल्याला आपली आई मनिषा हीचे आणि आजोबा गणपत रहाटे यांचे मार्गदर्शन लाभते असे गौरांगने सांगितले .

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE