रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गे धावणारी नागरकोईल ते गांधीधाम ही साप्ताहिक एक्सप्रेस गाडी नव्या एल एच बी कोचसह धावताना दिसणार आहे. रेल्वेने जुने पारंपरिक डबे बदलून त्याऐवजी अत्याधुनिक श्रेणीतील एल एच बी डबे गाड्यांना जोडण्यात येत आहेत. त्यानुसार हा बदल केला जात आहे.
कोकण रेल्वे मार्गे धावणारी नागरकोईल ते गांधीधाम एक्सप्रेस (16336/1635) या गाडीला नागरकोइल येथून सुटताना दिनांक 26 नोव्हेंबर 2024 रोजी च्या फेरीपासून तर (16335 ) गांधीधाम येथून नागरकोईलसाठी धावताना दिनांक 29 नोव्हेंबर 2024 च्या फेरीपासून या गाडीला एलएचबी श्रेणीतील डबे जोडले जातील.
याआधी ही गाडी 23 डब्यांची होती. एलजी श्रेणीतील डब्यांमध्ये आसन क्षमता आधीच्या तुलनेत वाढत असल्याने आता ही गाडी 23 ऐवजी 22 एल एच बी डब्यांची धावणार आहे.
