अण्णासाहेब चव्हाण यांची रत्नागिरी जि. प. च्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती

रत्नागिरी : राज्यभरातील वरिष्ठ स्तरावरील अधिकाऱ्यांच्या करण्यात आलेल्या बदल्यांमध्ये रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी अण्णासाहेब चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या या पदावर कीर्तीकरण पुजार हे कार्यरत आहेत.
दोन वर्षांपूर्वी रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी सूत्रे स्वीकारल्यानंतर सौर ऊर्जा वापराला प्रोत्साहन देण्यासह बचतगटांच्या सक्षमीकरणावर त्यांनी भर दिला.
पर्यटनच्या माध्यमातून बचत गटाना सक्षम बनवण्यासाठी विद्यमान सीईओ कीर्तीकिरण पुजारी यांच्या कारकीर्दीत खाड्यांमध्ये हाऊस बोटीचा प्रकल्प मार्गी लागला आहे. अलीकडेच त्यांच्या उपस्थितीत सैतावडे खाडीमध्ये हाऊस बोट प्रकल्पाची पाहणी देखील करण्यात आली. सध्या हे काम अंतिम टप्प्यात आले आहे.
राज्यस्तरावर काही आयएएस दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आले आहेत. त्यामध्ये कीर्तीकिरण पुजार यांचाही समावेश आहे. त्यांच्या जागी रत्नागिरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पुणे येथे महसूल उपायुक्त पदावर कार्यरत असलेल्या अण्णासाहेब चव्हाण यांना नियुक्ती देण्यात आली आहे.
दरम्यान, रत्नागिरी जिल्हा परिषदेचे विद्यमान सीईओ कीर्तीकिरण पुजार यांना नेमकी कुठे नियुक्ती करण्यात आली हे समजू शकलेले नाही.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE