मुंबई : मुंबईच्या किनारपट्टीजवळ १८ डिसेंबर रोजी झालेल्या पर्यटक फेरी आणि भारतीय नौदल बोटीच्या अपघातात बेपत्ता झालेल्या सात वर्षीय मुलाचा मृतदेह शनिवारी सापडला. जोहान पाठान असे या मुलाचे नाव असून, या अपघातात त्याची आई देखील मृत्युमुखी पडली होती. हा मुलगा गोव्याचा रहिवासी होता.
मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथून उरण तालुक्यातील घारापुरी येथे लेणी पाहण्यासाठी प्रवासी बोटीतून जाताना झालेल्या दुर्घटनेतील सात वर्षीय मुलाचा मृतदेह सापडल्याने १८ डिसेंबरच्या या दुर्घटनेतील मृत्यू झालेल्यांची संख्या १५ वर पोहोचली आहे. या शोधमोहीम कारवाईचा भाग म्हणून बेपत्ता प्रवाशांच्या शोधासाठी नौदल हेलिकॉप्टर आणि नौदल व किनारपट्टी रक्षक दलाच्या बोटी तैनात करण्यात आल्या होत्या, असे अधिकाऱ्याने सांगितले.
गुरुवारी, ४३ वर्षीय एका पुरुषाचा मृतदेह सापडला होता. भारतीय नौदलने शहराच्या बंदराच्या भागात झालेल्या या सर्वात भयंकर अपघातांच चौकशी सुरू आहे.
