Konkan Railway | नववर्ष स्वागतासाठी कोकण रेल्वे मार्गावर धावणार स्पेशल ट्रेन

रत्नागिरी  : नवीन वर्षाच्या स्वागतासाठी गोव्याला येणाऱ्या प्रवाशांसाठी देशाच्या राजधानीतून दक्षिणेत तिरुअनंतपुरमपर्यंत धावणाऱ्या विशेष गाडीची घोषणा केली आहे. प्रवाशांच्या अतिरिक्त गर्दीचा सामना करण्यासाठी ही आरक्षित उत्सव विशेष गाडी चालवली जाणार आहे.

कोकण रेल्वे मार्ग धावणारे या विशेष गाडीचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
गाडी क्र. ०४०८२ / ०४०८१ हजरत निजामुद्दीन – तिरुवनंतपुरम सेंट्रल – हजरत निजामुद्दीन आरक्षित उत्सव विशेष एक्सप्रेस:
गाडी क्र. ०४०८२ हजरत निजामुद्दीन – तिरुवनंतपुरम सेंट्रल आरक्षित उत्सव विशेष एक्सप्रेस ही शनिवार, दि. २८/१२/२०२४ रोजी १९:२० वाजता हजरत निजामुद्दीनहून प्रस्थान करेल. ही गाडी तिसऱ्या दिवशी १९:४५ वाजता तिरुवनंतपुरम सेंट्रलला पोहोचेल.
गाडी क्र. ०४०८१ तिरुवनंतपुरम सेंट्रल – हजरत निजामुद्दीन आरक्षित उत्सव विशेष एक्सप्रेस ही मंगळवार, दि. ३१/१२/२०२४ रोजी सकाळी ०७:५० वाजता तिरुवनंतपुरम सेंट्रलहून प्रस्थान करेल. ही गाडी तिसऱ्या दिवशी सकाळी ०६:४५ वाजता हजरत निजामुद्दीनला पोहोचेल.

असे असतील विशेष गाडीचे थांबे

ही गाडी कोटा जंक्शन, रतलाम जंक्शन, वडोदरा जंक्शन, उधना जंक्शन, वसई रोड, पनवेल, रोहा, चिपळूण, रत्नागिरी, काणकोणवली, थिवीम, मडगाव जंक्शन, कारवार, कुमटा, मूकांबिका रोड बायंदूर, कुंदापूर, उडुपी, मंगलोर जंक्शन, कासरगोड, कन्नूर, कोझिकोड, शोरणूर जंक्शन, त्रिसूर, अलुवा, एर्नाकुलम टाउन, कोट्टयम, तिरुवल्ला, चेंगन्नूर, कायंकुलम, कोल्लम जंक्शन आणि वरकला शिवगिरी या स्थानकांवर थांबेल.


गाडीला डबे याप्रमाणे असतील

या विशेष गाडीला एकूण १९ एलएचबी कोच असतील. त्यात तू टायर एसी – ०५ कोच, थ्री टायर  श्रेणी एसी – १०, सामान्य – ०२, जनरेटर कार – ०१, एसएलआर – ०१.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

best news portal development company in india

READ MORE