अमेरिकेतील विद्यापीठाच्या सुभाष गायकवाड डॉक्टरेट पदवीने सन्मानित

उरण (विठ्ठल ममताबादे ) : सामाजिक कार्यकर्ते सुभाष गायकवाड हे शिक्षण क्षेत्रात २५ वर्ष उल्लेखनीय कार्य करीत आहेत. शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या कार्याची दखल घेऊन अमेरिकेतील विद्यापीठाने त्यांना डॉक्टरेट देऊन सन्मानित केले आहे

विद्यार्थ्यांपासून प्रत्येक घटकातील समाजापर्यंत नवी मुंबईमध्ये आदर्श विद्यानिकेतन शिक्षण संस्था नवी मुंबई संचलित विश्वभारती हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज कोपरखैरणे नवी मुंबई येथे सुरू करून या परिसरामध्ये गोरगरीब गरजू कामगार वर्गातील विद्यार्थ्यांना कमी फी मध्ये व बऱ्याच विद्यार्थ्यांना मोफत असे दर्जेदार व कौशल्यपूर्ण शिक्षण दिले.

गरजू विद्यार्थ्यांना प्रत्येक क्षेत्रात मदत केली, विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी नेहमीच प्रयत्न केला आहे. दर्जेदार शिक्षणामुळे सदरील संस्थेतून इंजिनिअर, डॉक्टर, वकील, पोलीस अधिकारी, व्यावसायिक अशा अनेक विविध क्षेत्रात विद्यार्थी प्राविण्य मिळवले आहेत. यासाठी गायकवाड यांचे महत्वपूर्ण योगदान राहिले आहे, शैक्षणिक क्षेत्रात सकारात्मक भूमिका ठेवून विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारण्यासाठी निष्ठेने आणि समर्पितपणे कार्य करत असतात तसेच शिक्षण संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या हितासाठी विविध उपक्रम मार्गदर्शन शिबिर विविध सामाजिक उपक्रम ते राबवीत असतात.शिक्षण क्षेत्रात संघर्ष व कठोर परिश्रम करून अमूल्य योगदान दिल्याबद्दल त्यांच्या कार्याचा यथोचित सन्मान युनिव्हर्सिटी ऑफ तोलोसा मेक्सिको अमेरिका या अतिशय नामांकित असलेल्या विद्यापीठाकडून द डिग्री ऑफ डॉक्टर ऑफ एज्युकेशन, डॉक्टरेट पदवी देऊन, डॉ. व्ही. कट्टा बोमन कंट्री डायरेक्टर इंडिया युनिव्हर्सिटी ऑफ तोलोसा मेक्सिको अमेरिका यांच्या हस्ते सुभाष गायकवाड यांना सन्मानित करण्यात आले आहे. सध्या सुभाष गायकवाड हे विश्वभारती हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज कोपरखैरणेचे प्रमुख आहेत.तसेच भाजपा जिल्हा सरचिटणीस अनुसूचित जाती मोर्चा नवी मुंबई या पदावर कार्यरत आहेत .तथा ऐरोली विधानसभा संयोजक अनुसूचित जाती मोर्चा नवी मुंबई या पदाची यशस्वी धुरा सांभाळत आहेत. सुभाष गायकवाड यांना डॉक्टरेट पदवी मिळाल्याने सर्वच स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE