मुंबई : ऑगस्ट २०२४ मधे १२६१९ मत्स्यगंधा एक्सप्रेसमधून प्रवास करत असताना समाज माध्यमांवर विशेषतः यूट्यूबवर प्रसिद्ध असलेल्या चिन्मय कोले (रा. मुंबई, मूळ गाव – वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग) यांच्या अंगावर डब्याच्या छताचा काही भाग पडला. चिन्मयने लगेच आपल्या इन्स्टाग्रामवर त्याबाबतचा व्हिडिओ टाकला. त्याची दखल उडुपी-चिकमंगळुरूचे खासदार श्री. कोटा श्रीनिवास पुजारी यांनी घेऊन रेल्वे मंत्रालयाकडे या गाडीला तातडीने आधुनिक एलएचबी डबे जोडण्याची विनंती केली.
सोमवार दि. १७ फेब्रुवारी, २०२५ पासून १२६२० मत्स्यगंधा एक्सप्रेस एलएचबी डब्यांसहित धावू लागली. त्यावेळी खासदार श्री. कोटा श्रीनिवास पुजारी यांनी श्री. चिन्मय कोले यांचा विशेष सन्मान केला.
