अलिबागमध्ये ३०० खाटांच्या नवीन जिल्हा रुग्णालय इमारतीचे भूमिपूजन

अलिबाग : रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथे ३०० खाटांच्या नवीन जिल्हा रुग्णालयाच्या आंतररुग्ण इमारतीच्या भूमिपूजन बुधवारी करण्यात आले. या कामाला तत्कालीन पालकमंत्रीपदी उदय सामंत हे असताना मंजुरी मिळाली होती. यामुळे रुग्णालय इमारतीचे भूमिपूजन उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत बुधवारी करण्यात आले.

गेल्या २५ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या मागणीच्या पूर्ततेसाठी रायगडच्या पालकमंत्री पदी उदय संबंध हे असताना मंजुरी मिळवण्यात यश मिळाले. या नव्या सुविधेमुळे परिसरातील रुग्णांची अन्यत्र जाण्याची धावपळ थांबेल आणि त्यांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध होतील, असा विश्वास ना. उदय सामंत यांनी व्यक्त केला. भविष्यात या भागाच्या सर्वांगीण विकासासाठी महायुती सरकार कायम अग्रेसर राहील, अशी शाश्वती दिली.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE