राजापूर : शिवसेना नेते तथा माजी खासदार विनायक राऊत यांच्या सूचनेनुसार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या येथील पक्ष कार्यालय प्रमुखपदी संजय नारायण पेडणेकर यांची नियुक्ती करण्यात आली.
या प्रसंगी जिल्हाप्रमुख दत्ता कदम यांनी श्री. पेडणेकर यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. या वेळी जिल्हा समन्वयक रवींद्र डोळस, तालुका प्रमुख कमलाकर कदम, महिला तालुका संघटक प्राची शिर्के, उपतालुका प्रमुख रामचंद्र उर्फ तात्या सरवणकर, विभाग प्रमुख नरेश शेलार, विभाग प्रमुख संतोष हातणकर, माजी शहर प्रमुख अनिल कुडाळी, शिवसहकार सेनेचे विलास नारकर, अवजड सेनेचे शांताराम तळवडेकर, उपविभाग प्रमुख नाना गोटम, सुभाष पावणाक, अमोल पाडेकर, लांजाचे माजी उपसभापती सुभाष रामाणे, माजी पंचायत समिती सदस्य दिवाकर मयेकर, सुरेश हर्याण आदी उपस्थित होते.
