रत्नागिरी : होळी सणाच्या पार्श्वभूमीवर वास्को द गामा आणि पाटणा दरम्यान विशेष रेल्वे गाडी चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गोव्यातून सुटणारी ही गाडी रत्नागिरी, चिपळूण, पनवेल, कल्याण मार्गे पाटण्याला रवाना होईल.
रेल्वे क्रमांक 07311/07312 वास्को द गामा – पाटणा – वास्को द गामा एक्सप्रेस विशेष रेल्वे तपशील:
रेल्वे क्रमांक 07311 वास्को द गामा – पाटणा एक्सप्रेस विशेष:
वास्को द गामा येथून मंगळवार, 11/03/2025 रोजी 16:00 वाजता सुटेल.
पाटणा येथे तिसऱ्या दिवशी 10:30 वाजता पोहोचेल.
रेल्वे क्रमांक 07312 पाटणा – वास्को द गामा एक्सप्रेस विशेष :
पाटणा येथून शनिवार, 15/03/2025 रोजी 17:40 वाजता सुटेल.
वास्को द गामा येथे तिसऱ्या दिवशी 10:30 वाजता पोहोचेल.
थांबे :
ही रेल्वे मडगाव जंक्शन, थिवीम, सावंतवाडी रोड, रत्नागिरी, चिपळूण, रोहा, पनवेल, कल्याण जंक्शन, नाशिक रोड, मनमाड जंक्शन, भुसावळ, खंडवा जंक्शन, इटारसी जंक्शन, जबलपूर, कटनी, सतना, प्रयागराज छिवकी, पंडित दीन दयाळ उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा आणि दानापूर स्थानकांवर थांबेल.
गाडीची कोच रचना
एकूण 20 एलएचबी डबे: 1 द्वितीय श्रेणी एसी, 5 तृतीय श्रेणी एसी, 12 शयनयान (स्लीपर), 1 जनरेटर कार आणि 1 एसएलआर.
अशी आहेत वैशिष्ट्ये
होळी 2025 साठी विशेष रेल्वे सेवा.
वास्को द गामा आणि पाटणा दरम्यान थेट संपर्क.
प्रवासासाठी आरामदायक एलएचबी डब्यांची व्यवस्था.
