उरण (विठ्ठल ममताबादे ) : स्वामी ब्रह्मानंद प्रतिष्ठान सी बर्ड स्पेशल स्कूल बोरी शाळेतर्फे उरण तालुक्यातील केगाव माणकेश्वर मंदिरामध्ये अन्नपूर्णा दिवस साजरा करण्यात आला. शाळेतील मुलांना अन्नपूर्ण दिवसाचे महत्व याबद्दल मुलांना मार्गदर्शन करण्यात आले व बागायती शेतीला भेट देण्यात आली.

यावेळी उपस्थित मुलांनी उरण तालुक्यातील समुद्र किनारी निसर्ग रम्य ठिकाणी असलेल्या माणकेश्वर शिव मंदिरामध्ये भजन आणि कीर्तन असे विविध कार्यक्रम करत माणकेश्वर मंदिराचे व्यवस्थापकांचे मन जिंकली. तर नंतर शाळेतील मुले, मंदिराचे ट्रस्टी व पालक वर्ग आणि शिक्षक वृंद यांनी सर्वांच्या सोबत स्नेहभोजनाचा आनंद घेतला.
या कार्यक्रमास विद्यार्थ्यांचे पालक यांनी देखील सहभाग घेतला होता.तर विद्यार्थ्यांना त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी असे कार्यक्रम घेतले पाहिजे असे मत पालकांनी मांडले. मंदिराचे विश्वस्त यांनी मंदिराला शाळेने भेट दिल्याबद्दल शाळेचे आणि मुलांचे कौतुक करून मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेचा फार मोठा वाटा आहे या ठिकाणी असणारे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मुलांसाठी खूप चांगले नाविन्यपूर्ण कार्यक्रम करत असतात अशा शब्दात भावना व्यक्त करत शाळेला व मुलांना शुभेच्छा दिले. शेवटी आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
