मुंबई : लालबाग ते शिर्डी श्री साईबाबांच्या पालखी पदयात्रेचा शुभारंभ राज्याचे मराठी भाषा विभागाचे मंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आला.
साईलीला मंडळ लालबाग, मुंबई येथील या वेळच्या मानाच्या पालखी पदयात्रा सोहळ्यास राज्याच्या मराठी भाषा विभागाचे मंत्री उदय सामंत हे उपस्थित होते. ही पालखी लालबाग ते शिर्डी प्रवास ११ दिवसांमध्ये पूर्ण करत राम नवमीच्या शुभमुहूर्तावर शिर्डीला पोहोचणार आहे.

पालखीमध्ये यात्रेच्या शुभारंभ प्रसंगी ना. उदय सामंत यांनी साईबाबांची आरती व पूजा केली. त्यानंतर ना.सामंत यांनी पालखी खांद्यावर घेऊन पदयात्रेला सुरुवात केली. यावेळी पालखी पदयात्रेस डॉ. उदय सामंत यांनी शुभेच्छा दिल्या.
