- राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती
मुंबई : आग लागण्याआधी सतर्क करू शकेल, अशी यंत्रणा आणण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याची माहिती राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली. एक्स्ट्रीमस प्रायव्हेट लिमिटेड आणि नॅशनल सेफ्टी कौन्सिल यांच्यावतीने औद्योगिक आणि अग्नी सुरक्षा विषयावर आयोजित राष्ट्रीय परिसंवादास उपस्थित राहिले असता ते बोलत होते.
एक्स्ट्रीमस आणि नॅशनल सेफ्टी कौन्सिल यांच्या वतीने औद्योगिक आणि अग्नी सुरक्षा विषयावर आयोजित राष्ट्रीय परिसंवादास ना. सामंत यांनी उपस्थिती दर्शवली. आग लागण्याआधी अलर्ट करेल अशी यंत्रणा आणण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे, यासाठी या क्षेत्रातील तज्ज्ञांनी शासनाला मार्गदर्शन करावे, अशी अपेक्षा या प्रसंगी त्यांनी व्यक्त केली.
उद्योग विभागाचा अग्निशमन विभागाचे अत्याधुनिकीकरण करण्यात येत असून येत्या काळात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढवण्यावर भर दिला जाईल, या संदर्भात विभागाचा रोडमॅप तयार आहे.
–डॉ. उदय सामंत, उद्योग मंत्री महाराष्ट्र राज्य.

कोकणातील वणव्यांमुळे शेती आणि उद्योगांचे मोठे नुकसान होते, हे नुकसान टाळण्यासाठी ही तज्ज्ञांनी पुढे यायला पाहिजे, असं आवाहन या प्रसंगी त्यांनी केले.
