रत्नागिरी कोकण नगर येथे शबे कद्र उत्साहात साजरी

रत्नागिरी : दावते इस्लामी शाखा रत्नागिरी तर्फे कोकण नगर येथे शबे कद्र उत्साहात साजरी करण्यात आली.

सध्या मूस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरु आहे,या पवित्र रमजान महीन्या मध्ये २६ व्या दिवशी शबे कद्र ही साजरी केली जाते. या रात्री नमाज पठण तसेच दुवा केली जाते
शब ए कद्र ला अरबी भाषेत लैलतूल कद्र म्हणतात. इस्लाम धर्मात रमजान महिन्यातील एक खास रात्र असते त्या रात्रीला मुकद्दर की रात आणि भाग्यशाली रात्र म्हटले जाते. मुस्लिम धार्मिक मान्यतेनुसार, या रात्री अल्लाहची प्रार्थना करुन आपल्या पापांचा पश्चात्ताप करतात आणि असे मानले जाते की याचकांच्या पापांना माफ केले जाते. रमजानच्या शेवटच्या १० रात्रींपैकी २१, २३, २५, २७ आणि २९ तारखेला शब-ए-कदर म्हणतात.

मुस्लिम समाजाच्या समजुतीनुसार कुराणातील आयते अल्लाहने प्रथम आपला दूत जिब्राईल यांच्याकरवी मोहम्मद पैगंबराकडे कुराण पोहचवले. शब-ए-कदरला इंग्रजीत नाइट ऑफ डिक्री, नाइट ऑफ पॉवर आणि नाइट ऑफ व्हॅल्यू असेही म्हणतात. शब-ए-कद्रची रात्र रमजानच्या शेवटच्या 10 दिवसांतील कोणतीही रात्र असू शकते.

शबे कद्र च्या रात्री ज्यांनी रमजानचे पुर्ण ३० रोजे,फैजाने अत्तार चे इमाम यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या वेळी दावते इस्लामी रत्नागिरी शाखेचे सदस्य उवेज जरीवाला,अल्ताफ कुरेशी, अकील मेमन तसेच ख्वाजा गरीब नवाज रिलीफ फाउंडेशनचे रत्नागिरी चे अध्यक्ष फारूक जरिवाला, साजिद मेमन उपस्थित होते.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE