रत्नागिरी : उन्हाळी हंगामातील प्रवाशांची वाढतील गर्दी लक्षात घेऊन मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस ते करमाळी दरम्यान वातानुकूलित साप्ताहिक एक्स्प्रेस 11 एप्रिलपासून धावणार आहे.
या संदर्भात कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार लो. टिळक टर्मिनस ते करमाळी साप्ताहिक वातानुकूलित एक्स्प्रेस (01051) ही दि. 11 एप्रिल ते 23 मे 2025 या कालावधीत दर शुक्रवारी धावणार आहे. ही गाडी लो. टिळक टर्मिनस येथून रात्री 10 वा. 15 मिनिटांनी सुटून दुसर्या दिवशी दुपारी 12 वाजता ती गोव्यात करमाळीला पोहचणार आहे. परतीच्या प्रवासात ही गाडी (01052) दि. 12 एप्रिल ते 24 मे या कालावधीत करमाळी येथून सुटणाार आहे. ही गाडी करमाळी येथून दुपारी अडीच वाजता सुटून दुसर्या दिवशी पहाटे 4 वा. 5 मिनिटांनी ती मुंबईत लो. टिळक टर्मिनसला पोहचेल.
ही गाडी ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर, वैभववाडी, नांदगाव, रोड, कणकवली, सिंधुुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी तसेच थीवी या स्थानकांवर थांबणार आहे.
ही गाडी एकूण 22 एलएचबी तसेच संपूर्ण वातानूकुलित असेल. यातील लो. टिळक टर्मिनस ते करमाळी या फेरीसाठीचे आरक्षण दि. 8 एप्रिल 2025 रोजी खुले होणार आहे.
