मठ येथील श्री लक्ष्मीपल्लीनाथ मंदिरात उद्या रक्तदान शिबिर

रत्नागिरी : मठ (ता. लांजा, जि. रत्नागिरी) येथील श्रीदेव लक्ष्मीपल्लीनाथाचा १०९वा चैत्रोत्सव ७ एप्रिल २०२५ पासून सुरू झाला असून, तो १२ एप्रिलपर्यंत चालणार आहे. विविध धार्मिक, पारंपरिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम यात होत आहेत. सामाजिक बांधिलकी जपण्याच्या हेतूने ११ एप्रिल रोजी सकाळी या उत्सवात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. श्री देव लक्ष्मीपल्लीनाथ संस्थान (मठ) आणि रत्नागिरीतील धन्वंतरी धर्मादाय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर होणार आहे.
एका व्यक्तीने केलेले रक्तदान तिघांचे जीव वाचवू शकते. रक्तदान हा साऱ्या समाजानेच निरंतर करत राहण्याचा यज्ञ आहे. त्यामुळे धार्मिक यज्ञयागांसोबतच हा रक्तदानाचाही यज्ञ संस्थेने आयोजित केला आहे. केवळ श्री लक्ष्मीपल्लीनाथाचे कुलोपासकच नव्हे, तर साऱ्या भक्तांनी या रक्तदान शिबिरात सहभागी व्हावे, असे आवाहन श्री लक्ष्मीपल्लीनाथ संस्थेने केले आहे.
स्थळ : श्री लक्ष्मीपल्लीनाथ मंदिर, मठ, ता. लांजा, जिल्हा रत्नागिरी
दिवस-वेळ : शुक्रवार, ११ एप्रिल २०२५. सकाळी १० ते दुपारी दोन वाजेपर्यंत.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

Pelli Poola Jada

READ MORE