नाचणे येथे मुलांसाठी विनामूल्य समर कॅम्पचे आयोजन


रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील सलग चौथ्या वर्षी समर कॅम्प आयोजित करणारी महाराष्ट्रातील पहिली ग्रामपंचायत व जिल्हा परिषदेची पहिली मराठी शाळा ठरली आहे. नाचणे ग्रामपंचायत व जि.प.पू.प्राथमिक विद्यामंदिर नाचणे नं. १ यांच्यावतीने समर कॅम्पचे आयोजन सलग चौथ्या वर्षी यशस्वीपणे करण्यात आले आहे.

मनोरंजन, कला, आरोग्य व सुसंस्कारांसह विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी ह्या दोन दिवसीय कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. 4 ते 12 वर्षे वयोगटातील मुलांसाठी असून प्रवेश विनामूल्य आहे. दि.०३व ०४मे रोजी सकाळ सत्रात स. ७.३०.ते ११.३० या वेळेत समर कॅम्प होणार आहे.
शिबीरात मुंबई व रत्नागिरीतील नामवंत कलाकार मार्गदर्शन करणार आहेत. त्यामध्ये सहभागीना झुंबा, योगा ,जादूचे प्रयोग, ओरीगामी,क्राफ्ट, मनोरंजक खेळ, पक्षांचे आवाज,फेस पेंटिंग, आजी आजोबांच्या गोष्टी, बोला बिनधास्त, बालगीते ,बडबडगीतं,रेकॉर्ड डान्स बाबत डेमो व मार्गदर्शन केले जाणार आहे. रत्नागिरी शहर व परिसरातील मुलांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन सरपंच ऋषिकेश भोंगले, उपसरपंच निलेखा नाईक ,सदस्य शुभम सावंत, शरदिनी मुळ्ये, दीपक नागवेकर यांनी केले आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE