- रत्नागिरीत सॅनिटरी पॅड वेंडींग मशीन चे अनावरण
रत्नागिरी : येथील के.सी. जैन नगरमध्ये “हस्ती रहो, खेलती रहो!” या टॅगलाईनसह सॅनिटरी पॅड वेंडींग मशीनचे अनावरण जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले.
मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते फित कापून आणि मशीनचे पूजन करून या उपक्रमाची सुरुवात झाली. यावेळी महिलांसाठी वापरण्यात येणाऱ्या सॅनिटरी पॅड्सविषयी माहिती घेण्यात आली. ही पॅड्स पूर्णतः सॅनिटाइज्ड असून, विशेषतः शाळकरी विद्यार्थिनींसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत. शाळा, महाविद्यालये व इतर ठिकाणी या विषयावर जनजागृती करण्यासंदर्भात संवाद साधला.
या कार्यक्रमाला तालुका प्रमुख श्री. बाबू म्हाप, श्री. हर्षद भाटकर आणि इतर मान्यवर व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
