आंतरराष्ट्रीय मि. आशिया मेन फिजिक स्पर्धेत उरणच्या प्रतिक दर्णे चे यश.

उरण दि ३(विठ्ठल ममताबादे ) पटाया थायलंड येथे पार पडलेल्या एशियन फिटनेस अँड बॉडी बिल्डिंग चॅम्पियनशिप दरम्यान मेन फिजिक या खेळात उरणच्या प्रतिक दर्णे याला ब्रॉन्झ मेडल मिळाल्याबद्दल त्याचे रायगड,महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात त्याचे कौतुक होत आहे.रायगड जिल्हा हौशी शरीर सौष्ठव  संघटना, महाराष्ट्र राज्य हौशी शरीर सौष्ठव संघटना तसेच इंडियन फिटनेस अँड बॉडी बिल्डिंग फेडरेशन मधून त्यांची निवड मि. आशिया मेन फिजिक या स्पर्धेसाठी झाली होती.व त्याची ही निवड त्याने सार्थ करून दाखवली. या स्पर्धेसाठी त्याच्यासाठी ज्या ज्या शिक्षकांनी त्याची मदत केली अशा सर्वांचे त्याने जाहीर आभार मानले. यापुढे रायगड जिल्ह्यातील अनेक स्पर्धक आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी तयार करण्याचे त्याचे ध्येय आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE