पनवेल येथील कार्यक्रमात अनेक युवकांचा मनसेमध्ये प्रवेश

उरण (विठ्ठल ममताबादे ): मनसे पक्ष प्रमुख राज साहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार व युवा नेते अमित ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी तळोजा मनसे कार्यालय पनवेल गड येथे विविध क्षेत्रातील पक्षातील तरुणांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा हाती घेतला. व पक्ष प्रवेश केला.तसेच संघटनात्मक मजबुती करण्याकरता असंख्य विभागातील विभाग अध्यक्ष व उपविभाग अध्यक्ष यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या.रायगड जिल्हा अध्यक्ष संदेश भाई ठाकूर, उपजिल्हा अध्यक्ष प्रवीण दळवी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश व पद नियुक्त्यांचा कार्यक्रम पार पडला.पनवेल तालुक्यामध्ये अतिशय उत्साहात आणि नवचैतन्य वातावरणात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झंझावात वाढतच आहे.आणि यापुढे देखील हजारो महिला भगिनींची पक्षप्रवेश प्रलंबित असून लवकरच होणार्‍या पुढील जाहीर मेळाव्यामध्ये प्रवेश घेवुन संपूर्ण पनवेल तालुका हा मनसेमय करणार असा निर्धार पनवेल तालुका अध्यक्ष रामदास पाटील यांनी व्यक्त केला. जिल्हाध्यक्ष अध्यक्ष रामदास पाटील यांनी सर्व नवनियुक्त पदाधिकारी व नविन पक्ष प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे कौतुक केले. मनसे जिल्हाध्यक्ष रामदास पाटिल यांच्या नेतृत्वात भूमिपुत्रांचे आंदोलने उभारून पक्षाची ताकद वाढवू असा निर्धार यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE