पोलिस भरतीबाबत मार्गदर्शन शिबीर

उरण दि 30 ( विठ्ठल ममताबादे)सध्या पोलिस भरती बाबत महाराष्ट्र शासना तर्फे लेखी व शारिरिक परिक्षा बाबत शासन निर्णय (G.R) निघाले असून लवकरच पोलिस भरतीची प्रक्रिया सुरु होणार आहे. सर्वसाधारणे 7 हजार 231 पदांची जुलै ऑगस्ट मध्ये पोलीस भरती होणार आहे. त्या अनुषंगाने पोलिस भरतीचे अभ्यास करणाऱ्या विदयार्थ्यासाठी, पोलिस पदाच्या नोकरीसाठी इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था उरण व शिक्षा डिफेन्स ऍण्ड स्पोर्टस ट्रेनिंग अकॅडेमी बोकडविरा यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि 3 जुलै 2022 रोजी दुपारी 5 ते सायंकाळी 6 : 30 या वेळेत श्री बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुल,विमला तलाव गार्डन शेजारी, देऊळवाडीतील दत्त मंदिरा पाठिमागे, उरण शहर येथे महाराष्ट्र पोलिस व सरळसेवा मेगा भरती 2022 लेखी व शारिरिक परिक्षेबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

शिक्षा डिफेन्स ऍण्ड स्पोर्टस ट्रेनिंग अकॅडमी बोकडविरा या संस्थेचे संस्थापक तथा एन आय एस अथलेटिक्स प्रशिक्षक, आंतरराष्ट्रीय धावपटू प्रशांत पाटील हे पोलीस भरती बाबत मार्गदर्शन करणार आहेत. तरी जास्तीत जास्त युवकांनी या मार्गदर्शन शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE