संगीताताई ढेरे महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या मानकरी

उरण दि 30 (विठ्ठल ममताबादे) : मानसी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था महाराष्ट्राच्या वतीने औरंगाबाद येथील मौलाना आझाद संशोधन केंद्र टि.व्ही सेंटर या सभा गृहात विविध क्षेत्रातील गुणवतांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.गरिब व गरजू व्यक्तींना मदत करणाऱ्या अश्या समाजसेवेच्या कार्याची दखल घेवून रायगडमधील भूषण संगीता ढेरे यांना माजी खासदार भागवतजी कराड यांच्या हस्ते महाराष्ट्र भूषण 2022 हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

अंबादासजी दानवे( विधानपरिषद सदस्य महाराष्ट्र राज्य), जेष्ठ समाज सेवक रमेश अण्णा मुळे,जेष्ठ साहित्यिक प्रा.ऋषिकेश कांबळे यांच्या सोबतच मानसी महिला बहूउद्देशीय सेवाभावी संस्था महाराष्ट्रच्या अध्यक्षा डॉ.आशा पाटील,सुलक्षणा शिंदे पाटील( सचिव ) आणि समस्त मानसी सेवाभावी संस्था महाराष्ट्र या संस्थेचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.हा दिमाखदार पुरस्कार वितरण सोहळा अगदी मोठ्या उत्साहात आणि उत्तम प्रतिसादात संपन्न झाला.

समाज कार्यामुळे संगीता ढेरे यांना आजपर्यंत अनेक राज्यस्तरिय पुरस्कार मिळाले आहेत. मानसी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था महाराष्ट्र या नामांकित संस्थेतर्फे संगीता ढेरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2022 मिळाल्याने त्यांचे सर्व स्तरातून कौतूक होत असून विविध क्षेत्रातून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव त्यांच्यावर होत आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE