नेत्रावती एक्सप्रेस २० पासून तर गरीब रथ एक्सप्रेस २२ पासून विजेवर
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्ग धावणाऱ्या नेत्रावती तसेच गरीबरथ एक्सप्रेस या दोन गाड्या विद्युत इंजिनसह चालविल्या जाणार आहेत. यातील नेत्रावती एक्सप्रेस दिनांक 20 सप्टेंबरपासून गरीबरथ एक्सप्रेस 22 सप्टेंबर पासून विजेवर चालवली जाणार आहेत.
कोकण रेल्वेचा संपूर्ण मार्गाचे विद्युतीकरणाचे काम सहा महिन्यांपूर्वीच पूर्ण झालेले असल्याने आता टप्प्याटप्प्याने यामार्गे धावणाऱ्या रेल्वे गाड्या डिझेल ऐवजी विद्युत इंजिनिअर चालविल्या जाणार आहेत. दरम्यान विद्युतीकरण पुर्ण झाल्यानंतर गेल्या वर्षापासूनच कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या मालगाड्या विद्युत इंजिनवर चालवल्या जात आहेत. आता प्रवासी रेल्वे गाड्याही टप्प्याटप्प्याने विद्युत इंजिनवर चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या संदर्भात कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार तिरुअनंतपुरम ते लोकमान्य टिळक टर्मिनस दरम्यान धावणारी नेत्रावती एक्सप्रेस (16346) दिनांक 20 सप्टेंबर पासून विद्युत इंजिन सहा चालवली जाणार आहे तर लोकमान्य टिळक टर्मिनस ते तिरुवनंतपुरम सेंट्रल(16345) या मार्गावर धावताना 22 सप्टेंबर पासून नेत्रावती एक्सप्रेस लाम डिझेल ऐवजी विद्युत इंजिन वर चालवले जाईल.
याच बरोबर कोचुवेली ते मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस (12302) दरम्यान धावणार्या गरिब रथ एक्सप्रेस ला दिनांक 22 सप्टेंबर पासून विद्युत इंजिन जोडले जाणार आहे. उलट दिवसाच्या प्रवासात 23 सप्टेंबर पासून गरिब रथ एक्स्प्रेस डिझेल इंजिन ऐवजी विद्युत इंजिन वर धावेल.















