रत्नागिरी : कोकणवासीयांच्या पसंतीच्या मांडवी तसेच कोकणकन्या एक्सप्रेस दि. 20 सप्टेंबरपासून विद्युत इंजिन साधा होणार आहेत. या पाठोपाठ येत्या काही दिवसात कोकण रेल्वेच्या मार्गावरून एकूण अठरा गाड्या विजेवर चालविल्या जाणार आहेत.
कोकण रेल्वेचा संपूर्ण मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाल्यामुळे गेल्या वर्षी या मार्गावरून मालगाड्यांची वाहतूक सुरू झाल्यानंतर आता रत्नागिरी येथील ट्रॅक्शन सब स्टेशनचे उर्वरित काम पूर्ण झाल्यामुळे टप्प्याटप्प्याने सर्वच प्रवासी गाड्या विद्युत इंजिन सह चालवण्याचे नियोजन रेल्वेकडून करण्यात आले आहे.
दिनांक 20 सप्टेंबरपासून मुंबई सीएसटी ते मडगाव दरम्यान धावणार्या कोकणकन्या तसेच मांडवी एक्सप्रेस या दोन्ही गाड्या विद्युत इंजिनिसह धावणार आहेत. रेल्वेच्या अन्य झोनमधील गाड्या ज्या कोकण रेल्वेमार्गे धावतात त्या देखील विजेवर चालवण्याचे नियोजन टप्प्याटप्प्याने जाहीर केले जात आहे. यामुळे आता कोकण रेल्वे मार्गावरील प्रवास खऱ्या अर्थाने प्रवास पर्यावरणपूरक होणार आहे.















