भाईंदरमधील सोने -चांदी व्यापाऱ्याच्या रत्नागिरीत संशयास्पदरित्या घातपाताने खळबळ

रत्नागिरी शहरातून सोमवारी रात्रीपासून झाले होते गायब

रत्नागिरी : मुंबईतील भाईंदर येथील एका सोने-चांदी व्यापाराचा व्यावसायिक कामासाठी रत्नागिरीला आला असता रत्नागिरीत घातपात झाल्याची प्राथमिक माहिती उघड झाल्याने हा खळबळ उडाली आहे.


सोन्या-चांदीच्या व्यापारासाठी मुंबईतील भाईंदर मधून दिनांक 18 सप्टेंबर रोजी कीर्तिकुमार अजयराज कोठारी (55) ते रत्नागिरीत आले होते. मात्र, सोमवारी रात्रीपासून ते अचानक गायब झाल्याने त्यांच्या मुंबईतील नातेवाइकांनी रत्नागिरी पोलीस ठाण्यात ते बेपत्ता असल्याची तक्रार दिली.
याच दरम्यान गुहागर तालुक्यातील खोडदे आबलोली एका पुलाखाली गुंडाळलेल्या मृतदेह सापडल्याने शंकेची पाल चुकचुकली. गुहागर तालुक्यात खोडदे -आबलोली पुलाखाली सापडलेला मृतदेह सापडलेला मृतदेह कोठारी यांचाच असल्याची खात्री पोलिसांची करून घेतली.
कोठारी यांचा खून नेमका कोणी केला याचा तपास करीत आहेत. या प्रकरण बुधवारी रात्री रत्नागिरी पोलिसांनी तीन संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
दरम्यान घातपात झालेले कोठारी हे सोन्या-चांदीचे व्यापारी व्यापारानिमित्त रत्नागिरीत वरचेवर येत असत. रत्नागिरी शहरातील आठवडा बाजार येथील श्रद्धा लॉज मध्ये त्यांचे वास्तव्य होते. याच ठिकाणावरून कोठारी हे गायब झाले होते. त्या ठिकाणी त्यांचे केवळ सामानच आढळल्यामुळे त्यांच्या बेपत्ता पुण्यामध्ये घातपाताची शंका बुधवारी सायंकाळी उपस्थित केली जात होती. बुधवारी रात्री त्यांचा रहस्यमय पद्धतीने घातपात झाल्यावर शिक्कामोर्तब झाले. या घटनेमुळे रत्नागिरी शहरात खळबळ उडाली आहे.
पोलीस अधीक्षक मोहितकुमार गर्ग यांच्या नेतृत्वाखाली विविध पथकांच्या माध्यमातून या घटनेचा छडा लावण्याचे काम पोलिस करीत आहेत.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE