विदर्भ-कोकण जोडणारी गाडी 30 ऑक्टोबरपर्यंत धावणार !

रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर, कणकवलीसह कुडाळला थांबे

रत्नागिरी : नागपूर ते मडगाव दरम्यान धावणार्‍या विशेष रेल्वे गाडीला ऑक्टोबर अखेरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. विदर्भ ते कोकण ऑरेंज सिटी सुपरफास्ट एक्स्प्रेस जोडणारी ही गाडी आता दि. 30 ऑक्टोबरपर्यंत धावणार आहे.
विदर्भातून थेट कोकण रेल्वे मार्गावर येण्यासाठी रेल्वे गाडी नसल्यामुळे अशा गाडीची वारंवार मागणी होत होती. गर्दीचा हंगाम लक्षात घेऊन या मार्गावर विशेष गाड्यांचे नियोजन रेल्वेकडून करण्यात येते. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागपूर ते मडगाव (01139/01140) ही आठवड्यातून दोनदा धावणारी गाडी सप्टेंबर अखेरपर्यंत जाहीर करण्यात आली होती. मात्र, या नागपूर – मडगाव (गोवा) गाडीची मागणी लक्षात घेऊन रेल्वेने आता ही गाडी 30ऑक्टोबरपर्यंत विस्तारित करण्याचा निर्णय घेतला आहे
रेल्वेच्या सुधारित वेळापत्रकानुसार ही गाडी नागपूर ते मडगावपर्यंत चालवली जाणार आहे. त्यानुसार ही गाडी नागपूर येथून बुधवारी तसेच शनिवारी दुपारी तीन वाजून पाच मिनिटांनी सुटून गुरुवार तसेच रविवारी ती मडगावला दुसर्‍या दिवशी सायंकाळी 5 वाजता पोहोचेल. मडगाव (गोवा) ते नागपूर दरम्यान धावताना ही गाडी (01140) गुरुवार तसेच रविवारी मडगावमधून रात्री 8 वा. सुटून दुसर्‍या दिवशी रात्री साडेनऊ वाजता ते नागपूरला पोहोचेल. मडगाव (गोवा)ते नागपूर दरम्यान धावताना ही गाडी (01140) गुरुवार तसेच रविवारी मडगावमधून रात्री 8 वाजता सुटून दुसर्‍या दिवशी रात्री साडेनऊ वाजता ते नागपूरला पोहोचेल.
नागपूर ते मडगाव (गोवा)या प्रवासात गाडी वर्धा, पुलगाव, धामणगाव बडनेरा, अकोला मलकापूर, भुसावळ, नाशिक, इगतपुरी, कल्याण, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर, कणकवली, कुडाळ, थीवी तसेच करमाळी या स्थानकांवर थांबणार आहे. एक महिन्याच्या कालावधीत या विशेष गाडीच्या दोन्ही बाजूच्या मिळून अठरा फेर्‍या होणार आहेत. या गाडीचा अधिकाधिक प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कल्याण सावंतवाडी रेल्वे प्रवासी समन्वय समिती मुंबई अध्यक्ष सुनील उत्तेकर, पुणे कल्याणमार्गे सावंतवाडी रेल्वे प्रवासी समन्वय समिती मुंबई अध्यक्ष यशवंत परब, राष्ट्रीय रेल्वे प्रवासी संघटना शेगाव अध्यक्ष राजकुमार व्यास, राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटना शेगांव अध्यक्ष शबनम शेख,सरचिटणीस वैभव बहुतूले, संघटनमंत्री ओमकार माळगांवकर, संपर्कप्रमुख हर्षद भगत, दापोली तालुकाध्यक्ष नागेश मयेकर,मंडणगड तालुकाध्यक्ष संदेश गांधी, प्रवासी सुधिर राठोड, दीपक सोनवणे, गजानन राठोड आदींनी केले आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE