चिपळूणच्या ‘लोटिस्मा’ वाचनालयात दिवाळी अंक योजना

सोडत पद्धतीने एक अंक भेट मिळणार

चिपळूण : येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिरात याही वर्षी वाचकांसाठी दिवाळी अंक योजनेची नावनोंदणी सुरु करण्यात आली आहे. या योजनेची वाचनालयाच्या सभासदांसाठी वर्गणी रुपये २०० तर बिगर सभासदांसाठी वर्गणी रुपये २०० आणि डिपॉझिट रुपये १०० असणार आहे.

ही योजना २७ ऑक्टोबर २०२२ ते ३१ मार्च २०२३ पर्यत कार्यान्वित असेल. एप्रिल २०२३ मध्ये योजनेतील प्रत्येक सभासदाला सोडत पद्धतीने एक अंक भेट दिला जाणार आहे. लोटिस्मा वाचनालय हे १५७ वर्ष जुने असून या वाचनालयात पंच्याहत्तर हजारहून अधिक ग्रंथ आहेत. कोकण हे बुद्धीवैभवाचे आगर आहे. सहा भारतरत्ने, अनेक समाजसुधारक, लेखक, इतिहास संशोधक, विचारवंत कोकणाने देशाला दिले. या सर्वांचे पुढील पिढीला परिचय व्हावेत म्हणून वाचनालयाने कलादालन निर्माण केले आहे. यामध्ये सर्व महनीय व्यक्तींची तैलचित्र त्यांच्या माहितीसह लावण्यात आली आहेत. वाचनालयात साहित्यिक आणि सांस्कृतिक उपक्रम नियमित चालू असतात. प्रतिवर्षी वाचनालायतर्फे सामाजिक साहित्यिक पुरस्कार दिले जातात. प्राथमिक शाळांमध्ये बालसाहित्य दिले जात असते. अशा लोटिस्मा वाचनालयात सध्या दिवाळी अंक योजनेची नाव नोंदणी सुरू आहे. या योजनेचा अधिकाधिक वाचकांनी लाभ घ्यावा, अधिक माहितीसाठी 9067375738 येथे संपर्क साधावा असे आवाहन वाचनालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE