संगमेश्‍वरातील कोंड असुर्डे ग्रा. पं.च्या थेट सरपंचपदी सिध्दिका बोल्ये यांची निवड

संगमेश्वर : नजीकच्या कोंडतो ग्रामपंचायतीच्या थेट सरपंचपदासाठी झालेल्या अटीतटीच्या लढतीत 25 वर्षीय सिद्धीका संदीप बोल्ये यांची निवड झाली आहे.
वयाच्या अवघ्या पंचविशीत सिद्धीकाने गावकारभारीण बनण्याचा मान मिळवला आहे. अटीतटिच्या लढतीत ६ मतांनी ती विजयी झाली आहे.
सिद्धीका ही बारावीच्या वाणिज्य शाखेतून ७९ % टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाली आहे.
गाव पॅनलच्या माध्यमातून थेट सरपंचपदी विराजमान
सिध्दिका टेलरिंग करून वडील संदीप बोल्ये यांना हातभार लावत आहे
आपणं गावच्या विकासासाठी आवश्यक असेल ते करण्याची जबाबदारी घेतली असून सर्वांच्या सहकार्याने गावचा विकास नक्कीच होईल, याची खात्री आहे. आपल्यावर जो ग्रामस्थांनी विश्वास दाखवला आहे तो विश्वास सार्थ करून दाखवण्याची जबाबदारी आहे. गावच्या विकासासाठी कोणत्याही परिस्थितीत राजकारण करणार नाही, अशी ग्वाही नवनिर्वाचित सरपंच सिध्दिका बोल्ये यांनी दिली.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE