जुन्या काळातील प्रसिद्ध ठेकेदार शरद पाटणे यांचे निधन

देवरूख (सुरेश सप्रे) : संगमेश्वर तालुक्यातील कोळंबे गावातील जुन्या काळातील व्यावसाईक, सामाजिक कार्यकर्ते, व शासकिय ठेकेदार शरद पाटणे यांचे वृद्धापकाळाने दि. २५ रोजी सकाळी १० वाजता निधन झाले.
शरद पाटणे यांनी अतिशय खडतर परिस्थितीत कोंळबे गावात आपला व्यवसाया बरोबरच शासकिय ठेकेदारी सुरू केली.. तसेच गावाच्या व पंचक्रोशीतील विकासात त्यांचे मोठे योगदान होते.
त्यांनी सार्वजनिक बांधकाम. जिप बांधकाम विभागात अनेक वर्षे ठेकेदार म्हणून काम करताना दर्जेदार कामे करून आपला वेगळा ठसा निर्माण केला होता. तसेच त्यांनी अनेकांना या व्यवसायात आणून आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यात मदत व मार्गदर्शन केले. त्याचा सुपुत्र अमोल पाटणे हाही अभियंता असून वडीलांचा आरसा पुढे नेत आहे. त्याने गावाचे सरपंच पद भुषविले असून गावच्या विकासासाठी मोठे योगदान देत आहेत.. त्याचेवर सायंकाळी खोळंबले गावातील स्मशानभुमित अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याचे निधनाने पंचक्रोशीतील स्कुल व व्यापारी पेठ बंद ठेवून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली..
त्याचे निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE