दहीहंडी उत्सवात मृत्यूमुखी पडलेला गोविंदा प्रथमेश परबच्या कुटुंबाला मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून १० लाखांची मदत

संघाचे महेश तावडे व श्री साई स्पोर्ट्सच्या प्रयत्नांना अखेर यश

मुंबई (सुरेश सप्रे ): भांडूप येथिल दहीहंडी उत्सवात श्री साई स्पोर्ट्स क्लबच्या गोविंदा पथकाचा सराव सुरू असताना प्रथमेश परब (वय २६) हा तरूण जखमी झाला होता. उपचार दरम्यान तो मृत्युमुखी पडला होता.
रामनगर भांडुप पश्चिम येथील प्रथमेश तुकाराम परब हा तरुण गोपाळकाला उत्सवात 16 ऑगस्ट 2022 रोजी रात्री प्रगती विद्यामंदिरच्या पटांगणावर श्री साई स्पोर्ट्स क्लबच्या गोविंदा पथकाचा सराव सुरू असताना तो जखमी झाला होता.त्यानंतर उपचार चालू असताना 11 सप्टेंबर 2022 रोजी प्रथमेशचा दुर्दैवी मृत्यू झाला.

या मृत तरुणाला मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत मिळावी यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक महेश तावडे , व श्री साई स्पोर्ट्सने सातत्याने प्रयत्न केले होते.
राज्य सरकारने गोविंदा उत्सवात अपघाती मृत्यू आलेल्या गोविंदाला दहा लाखांचे विमा संरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार राज्य सरकारकडून मृत तरुण प्रथमेशच्या वडिलांच्या नावे मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून दहा लाख रुपयांची मदत करण्यात आली आहे.


मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 10 लाख रुपयाची मदत मिळावी ,यासाठी महेश जयप्रकाश तावडे सर , प्रशिक्षक शैलेश जागडे, दहीहंडी समन्वय समितीचे अध्यक्ष बाळकृष्ण पडेलकर, दहीहंडी समन्वय समितीच्या सचिव गीता तळावडेकर झगडे, मुलुंड कुर्ला तहसीलदार डॉ. संदीप थोरात, तलाठी अमित पाटील, यांच्या पाठपुरावा व सहकार्याने प्रथमेशचे वडील तुकाराम परब यांना मुख्यमंत्री सहायता निधीतून 10 लाख रुपयांचा धनादेश तहसीलदार डॉ. संदीप थोरात यांच्या हस्ते मदत निधी त्यांच्या वडिलांकडे सुपुर्द करणेत आली .

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE