फार्मसी कॉलेज साडवलीचे प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये सुयश

देवरूख (सुरेश सप्रे) : प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्था संचलित इंदिरा इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी, साडवली येथील विद्यार्थ्यांनी रत्नागिरी येथे घेण्यात आलेल्या प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये यश मिळवत तृतिय क्रमांक पटकावला.

महाविद्यालयाच्या यशाची परंपरा कायम राखली आहे. महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, मुंबई यांच्या अंतर्गत रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयाने HIV AIDS या विषयावर नुकत्याच जिल्हास्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित केल्या होत्या. सदर स्पर्धेमध्ये महाविद्यालयाच्या तृतीय वर्ष बी. फार्म च्या विद्यार्थिनी आणि राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक कु. नेहा नामदेव धुळप आणि कु. आकांक्षा राजकुमार धोत्रे यांनी तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळवले. महाविद्यालयाचे चेअरमन रविंद्र माने. प्राचार्य डॉ. अमोल खाडे यांनी यशस्वी विद्यार्थिनी आणि मार्गदर्शक प्राध्यापक यांचे अभिनंदन केले आहे

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE