श्री स्वामी परमानंद महाराज समाधी मठावर राजू मुंबईकर परिवाराकडून गोमातेचं दान

उरण दि.९ (विठ्ठल ममताबादे ) : उरणमधील सामाजिक कार्यकर्ते राजू मुंबईकर  यांनी श्री स्वामी परमानंदाश्रम ट्रस्ट मु.दादर,( परमानंद वाडी ) ता.पेण,जि.रायगड यांच्या समाधी मठावरील आश्रमात एका गिर जातीच्या गाईच्या रूपाने गोदान उपक्रम राबवला.

हिंदू धर्मात गाय,गायत्री आणि गंगा ह्या तीन गोष्टीनां अनन्यसाधारण महत्व आहे धार्मिक मान्यतेनुसार आणि ज्योतिष शास्त्रानुसार गायीला फार फार महत्व दिले जाते.वास्तूशास्त्रानुसार वास्तुदोष असणाऱ्या एखाद्या घरात गायीच्या नुसत्या असण्याने त्या घरातील वास्तूदोषांचा नाश होते.तर धर्मशास्त्रानुसार तिच्या पूजनाचे सर्व देवांच्या पूजनाचे फळ प्राप्त होते.म्हणून गायीला फक्त पशु म्हणून न पाहता हिंदू धर्मात गायीला आईचं (गोमाता ) स्वरूप मानले जाते.पूजलं जातोय !.सोबतच आपल्या जीवनात आपण केलेल्  दान सुद्धा एक सत्कार्याचे रूप आणि दैवी गुण आहे असं मानलं जातोय !आपल्या जवळ जे काही आहे ते निस्वार्थीपणे दुसऱ्याला देणं म्हणजे दान करणे होयं !आणि आज पर्यंत अनेक  सत्कार्याच्या माध्यमातून दिन-दुबळ्यां गरीब-गरजूवंतानां मदतरुपी दानधर्म करणारे व्यक्तिमत्व उरण मधील सामाजिक कार्यकर्ते राजू मुंबईकर  यांनी एक पुण्यकर्माचं कार्य केले आहे ते म्हणजे श्री स्वामी परमानंदाश्रम ट्रस्ट मु.दादर,( परमानंद वाडी ) ता.पेण,जि.रायगड यांच्या समाधी मठावरील आश्रमात एक गिर जातीच्या गोमातेला गायदान स्वरूपात समाधी मठावर अर्पण करण्यात आली.

      दान- धर्म आणि पूजा-कर्म केल्याने मनुष्याला जीवनात पुण्यकर्माचं भाग्य लाभतं !आणि आज हेच गायदानरुपी  पुण्यकर्म करून  राजू मुंबईकर  यांनी सत्कार्य केले आहे.श्रीमत् परमहंस श्री समर्थ स्वामी परमानंद महाराज समाधी मठावर सत्संगासोबत विविध धार्मिक कार्यक्रमांच आयोजन होत असते.त्याच सोबत तिथे होम-हवन विधी पार पडत असतात, अश्या धार्मिक पूजा-अर्चाच्यां प्रारंभी वास्तूशुद्धी करिता गोमूत्र आणि गायीच्या शेणाचा प्रमुख्याने उपयोग केला जातो आणि त्याच महत्व देखील खूप आहे .गोमूत्रात पोटॅशियम, कॅल्शियम,मॅग्नेशियम,कार्बोलिक ऍसिड ,सोडियम या सारखी अनेक खनिजद्रव्य असतात त्यामुळे शरीरातील बॅक्टेरियल आणि व्हायरल इन्फेक्शन देखील नाहीसे होतात सोबतच वातावरणातील बॅक्टेरिया देखील नष्ट होतात त्याच्यातच गिर जातीच्या गायीच्या गोमूत्राचं महत्व हे विज्ञानाने देखील मान्य केलं आहे.गायीच्या शेणाला देखील धर्मशास्त्रात खूप महत्व दिले गेलं आहे याच वैज्ञानिकदृष्टया आणि धार्मिक दृष्ट्या महत्व असलेल्या या गिर जातीच्या गायदानाला देखील खूप महत्व प्राप्त झाले आहे. उरण मधील सामाजिक कार्यकर्ते, रायगड भूषण राजू मुंबईकर  आणि राणिताई मुंबईकर यांच्या सोबत  त्यांची थोरली  सुकन्या  वैष्णवी मुंबईकर या परिवाराने गोमातेच यथासांग पूजन करून पुरोहिताच्या हस्ते,महाआरती,पूजाअर्चा करून परमानंद स्वामींच्या चरणी गोमातेच दान केलं आणि स्वामींच्या मठावरील सेवेकरी महाराज मंडळींनां गोड-धोंड मिठाईचं वाटप करून आपल्या मित्र परिवारासोबत मठावरील सर्व मंडळींच्या सोबतीनं महाप्रसादाचा  लाभ घेतला आणि लवकरच येथे एका सुंदर प्रशस्थ अश्या  गोशाळेचं सुद्धा पूजन आणि बांधकाम केलं जाईल अशी ग्वाही येथील सेवेकरी महाराज मंडळी आणि सर्व ट्रस्टी मंडळींनी दिली.

     या गायदाना सारख्या पवित्र धार्मिक कार्यक्रमा प्रसंगी  राजू मुंबईकर आणि राणीताई मुंबईकर यांच्या परिवारा सोबत श्री स्वामी परमानंद महाराज समाधी मठावर उपस्थित राहिले   ते विलासजी ठाकूर (सल्लागार कॉन ),प्रेमदादा म्हात्रे ( सचिव – श्री छत्रपती शिवाजी महाराज सामजिक संस्था ),अनिल घरत (उरण तालुका सचिव – आगरी,कोळी,कराडी संघर्ष सा.संस्था ),नवनीत पाटील (अध्यक्ष- गोल्डन ज्युबली मित्र मंडळ सारडे ),संपेश पाटील(अध्यक्ष – मित्र परिवार ),क्रांती म्हात्रे (खजिनदार मित्र परिवार), मिलन पाटील ( कार्याध्यक्ष – मित्र परिवार ) रचित म्हात्रे ( गुड्डू ), महानंदाताई ठाकूर,मयुरेश,हिमांशू,मयांक यांच्या सोबतच श्री स्वामी परमानंदाश्रम ट्रस्टचे अध्यक्ष  कृष्णकांत परील, उपाध्यक्ष एकनाथ पाटील, कार्याध्यक्ष उदय  पाटील, खजिनदार जनार्दन पाटील, सेवेकरी महाराज कृष्णाबाबा म्हात्रे आणि सर्व सेवेकरी  मंडळींसाय उपस्थितीत हा गायदानाचा पवित्र सोहळा मोठ्या धार्मिक वातावरणात संपन्न झाला.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE