रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील निवळी येथील उमेश रावणंग याच्या घरामध्ये एक मोठी घोरपड दिसुन आली. उमेश रावणंग यांनी तिला तासभर घराबाहेर हलवण्याचा प्रयत्न केला तरी ती काही जात नव्हती. घरामध्ये लहान मुलं व वयोवृद्ध माणसे घाबरल्यामुळे अखेर त्यांनी गो सेवा संघाचे सुशिल कदम यांना बोलवले. सुशिल कदम आणी अमीत खटावकर यांनी २ तासांच्या प्रयत्नानंतर घोरपडीला पकडून जीवदान दिले. घोरपडीला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. उमेश रावणंग आणि त्यांच्या परिवाराने गो सेवा संघाचे आभार मानले.
















