गेल इंडिया गॅस पाईपलाईनच्या जनसुनावणीमध्ये शेतकर्‍यांचा प्रकल्पास प्रचंड विरोध 

उरण दि १९ (विठ्ठल ममताबादे ) : रायगड जिल्ह्यातील उरण, पनवेल, पेण व अलिबाग तालुक्यातील विविध गावामधून गेल इंडिया कंपनी कडून प्रोपेन पाईपलाईन तसेच पैट्रोलियम व खनिज पाईप लाईन प्रकल्प जात आहे. या प्रकल्पा संदर्भात १८ नोव्हेंबर रोजी शेतकऱ्यांच्या हरकत अर्जावर गेल इंडियाकडून जे एन पी टी येथील बहुउद्देशीय हॉलमध्ये सुनावणी ठेवण्यात आली होती. या सुनावणीत गेल इंडिया अधिकारी संदीप शर्मा तसेच उपजिल्हाधिकारी अश्विनी पाटील उपस्थित होत्या. तसेच उरण, पनवेल, पेण व अलिबाग मधून बहुसंख्य शेतकऱ्यांची उपस्थिती पाहण्यात आली. या सुनावणीत सर्व तालुक्यातील शेतकर्‍यांनी एकाच सुरात गेल इंडिया गॅस पाइपलाइन प्रकल्पास विरोध दर्शविला.

सरकारने शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी मधून गॅस पाइपलाइन टाकल्यास शेतकऱ्यांच्या प्रचंड संघर्षांस सामोरे जावे लागेल. दरम्यान शेतजमीनीतुन पाईपलाईन टाकल्यास आजुबाजूचे क्षेत्र देखील लागवडीयोग्य राहणार नाही. शेतक-यांवर भविष्यात उपासमारीची वेळ येणार आहे. त्यामुळे भविष्यात संघर्ष करायला लागले तरी चालेल असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE