सिडकोच्या भू संपादन कायद्यास प्रगत शेतकरी प्रकाश ठाकूर यांचा विरोध

उरण दि १८(विठ्ठल ममताबादे ) : शासनाचे नगरविकास खाते व सिडको यांच्या संगनमताने नागांव रानवड च चाणजे विभागातील जमीनी या शेतजमीनी भात पिकाच्या दुय्यम पिकाच्या आंबा, नारळ, सुपारी व फळ पिके, संपूर्ण झाडीचा भाग असणारा सिडकोने भूसंपादनाच्या नावाखाली शेतक-यांना उध्वस्त करून रस्त्यावर आणून शासनाचे धोरण तरी काय आहे, असा सवाल उपस्थित करत प्रकाश ठाकूर, उद्यान पंडित शेतकरी, महाराष्ट्र शासन यांनी सिडकोद्वारे सध्या सुरु असलेले संपादन रद्द करावे, अशी मागणी एका प्रसिद्धी पत्रका द्वारे केली आहे.

उरण तालुक्यातील नागांव रानवड व चाणजे विभागातील जमीनी शासनाचे नगरविकास खाते व सिडको यांच्या संगनमताने सिडकोकडून भूसंपादीत करण्याचे 12 ऑक्टोबरला अधिसूचना प्रसिद्ध केलेली आहे. त्याला येथील शेतक-यांचा तिव्र विरोध आहे. त्या संबंधी सिडकोकडे आपल्या हरकती लेखी स्वरूपात नोंदविल्या आहेत.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE