रत्नागिरीतील नवनिर्मिती फाउंडेशन राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट संस्था पुरस्काराने सन्मानित

रत्नागिरी : शैक्षणिक,पर्यावरण अशा विविध क्षेत्रात काम करत असणारी रत्नागिरी जिल्ह्यातील नवनिर्मिती फाउंडेशन उक्षीच्या कामाची दखल घेत जनजागृती सेवा समिती महाराष्ट्र या संस्थेने  राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट संस्था पुरस्कार देऊन नवनिर्मिती फाउंडेशन उक्षी संस्थेचा सन्मान मुंबई येथे विजय वक्ते कक्ष अधिकारी मुंबई मंत्रालयल यांच्या हस्ते अनेक प्रमुकांच्या उपस्थितीत बहाल करण्यात आला.

नवनिर्मिती फाउंडेशन उक्षी रत्नागिरीचे अध्यक्ष रमजान गोलंदाज हे आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांना बरोबर घेवून रत्नागिरी जिल्ह्यात नाही तर महाराष्ट्र मध्ये काम करत आहेत. संस्थेचे विविध सामाजिक उपक्रम सूरू असून अन्यायाला वाचा फोडण्याचे संस्था करत आहे.

तळागाळातील प्रश्न सोडवण्याचे काम ही नवनिर्मिती फाउंडेशन संस्था करत आहे.संस्थेच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर मधील आंबेड येथे गरजू आणि गरिब विद्यार्थ्यांसाठी न्यू.व्हिजन इंग्लिश मिडीयम स्कुल आंबेड बु नावाची शाळा चालवली जात आहे.संस्थेने अनेक संकटात लोकांना आधार देण्याचा प्रयत्न केला असून राष्ट्रीय महामार्गांवर झालेल्या अपघातात लोकांना वाचण्यासाठी हाक द्या आम्ही आलोच हा उपक्रम राबवला जात आहे.शैक्षणिक दृष्टीने अनेक शाळा मधील विदयार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप केले जात आहे. अशा वेगवेळ्या उपक्रमाची दखल घेत जनजागृती सेवा समिती महाराष्ट्र यांनी दखल घेत नवनिर्मिती फाउंडेशन उक्षीला सन २०२२चा राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट  संस्था पुरस्काराने मुबंई येथे गौरवण्यात आले.

यावेळी प्रमुख उपस्थितीम्हणून विजय वक्ते वन आणि महसूल कक्ष अधिकारी मुंबई मंत्रालय,राष्टसंत डॉ. ज्ञानेश आनंद शास्त्री जी महाराज,रामजीत महादेव गुप्ता,राजेश कदम,जन सेवा समितीचे अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर आणि त्यांचे पदाधिकारी उपस्थित होते

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE