मडगाव-अहमदाबाद वन-वे स्पेशल एक्सप्रेस रविवारी धावणार

रत्नागिरी : मडगाव ते अहमदाबाद दरम्यान रविवारी दि.२७ नोव्हेंबर ) वन वे एक्सप्रेस गाडी धावणार आहे. एकूण 17 डब्यांची गाडी रविवारी रात्री मडगाव येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सायंकाळी सहा वाजता ती गुजरातमध्ये अहमदाबादला पोहोचल.


ही गाडी(01102) दिनांक 27 नोव्हेंबर रोजी मडगाव जंक्शन होऊन रात्री नऊ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सायंकाळी सहा वाजून 30 मिनिटांनी अहमदाबादला पोहोचेल.


ही वनवे स्पेशल एक्सप्रेस करमाळी, थीवीम, सावंतवाडी कुडाळ, कणकवली, वैभववाडी, रत्नागिरी, संगमेश्वर चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पनवेल, वसई, वापी, वलसाड, सुरत, भरूच, वडोदरा, नडियाद जंक्शनवर थांबे घेणार आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE