बाळासाहेबांची शिवसेना मिरजोळे जि. प. गटाच्या विभागप्रमुखपदी संदीप उर्फ बावा नाचणकर यांची निवड


रत्नागिरी, दि. २९ : बाळासाहेबांची शिवसेना शिंदे गटाच्या प्रतिनिधींच्या नियुक्त्या नुकत्याच जाहीर करण्यात आल्या आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे उपनेते, राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी तालुक्यात नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.


पालकमंत्री उदय सामंत यांनी बाळासाहेबांची शिवसेना गटाच्या मिरजोळे जि. प. गट विभागप्रमुखपदी संदीप उर्फ बावा नाचणकर यांची निवड जाहीर केली. या निवडीबाबत बोलताना संदीप उर्फ बावा नाचणकर म्हणाले की, मिरजोळे ग्रामपंचायत सरपंच म्हणून काम केले असल्यामुळे त्या अनुभवाचा भविष्यात खूप चांगला उपयोग होणार आहे. पालकमंत्री उदय सामंत यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे. तो विश्वास जपत काम करणार असल्याचे नाचणकर यांनी सांगितले. तसेच पक्षाच्या संघटना वाढीसाठी आपण प्रयत्न करू असे ते म्हणाले. संदीप नाचणकर यांच्या निवडीमुळे विविध स्तरावर त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

बाळासाहेबांची शिवसेना मिरजोळे जि. प. गटाच्या विभागप्रमुखपदी संदीप उर्फ बावा नाचणकर यांची निवड झाल्याबद्दल रत्नागिरीतील भारतरत्न सर डॉ. श्री. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या सभागृहात पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करताना संजय हळदणकर. सोबत पालकमंत्री उदय सामंत, महेश म्हाप, राजन शेट्ये, बिपीन बंदरकर, अभी दुडे व इतर.
Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE